आम्हालाही आमच्या पद्धतीने राडा करता येतो - धंनजय मुंडे

Foto
जालना - बदनापूर तालुक्यातील चितोडा येथील राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्यकर्ते भीमराव डिघे यांच्यावर हल्ला करणाऱ्या भाजपाच्या गुंडावर पोलिसांनी चोवीस तासाच्या आत अटक करा अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस जशास तसे उत्तर देईल असा इशारा विधान सभेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शनिवारी दिला.
धनंजय मुंडे हे दुष्काळी पाहणीसाठी जालना येथे आले होते. दरम्यान त्यांनी १२ नोव्हेंबर रोजी भीमराव डिघे यांच्यावर जालना शहरात आ. नारायण कुचे यांचा भाचा दीपक डोंगरे यांच्यासह त्यांच्या साथीदाराने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी जमखी झालेल्या भीमराव डिघे यांची  शनिवारी सायंकाळी मुंडे यांनी   पंधरा मिनिटे विचारपूरस केली. त्यांच्या आईशीही संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिका-यात चांगलेच राजकारण तापले आहे. शुक्रवारी हल्लेखोरांचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसने बदानापूर येथे रास्तारोको आंदोलन करुन शासनाचा निषेध केला होता.

रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर मुंडे यांनी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्याशी मोबाईलवर संपर्क करुन याबाबत आरोपींना अटक का केली नाही. याबाबत धारेवर धरत जाब विचारला. चोवीस तासात आरोपींना अटक करा अन्यथा आम्हाला पण आमच्या पध्दतीने राडा करता येतो. असा दम पोलीस अधीक्षकांना भरल्याने उपस्थित आवाक् झाले. यावेळी आ. राजेश टोपे, बबलू चौधरी, उपनराध्यक्ष राजेश राऊत, बाळासाहेब वाकुळीणीकर, अ‍ॅड संजय काळबांडे याच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदधिकाºयाची उपस्थिती होती.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker